प्रतिनिधी: महेश नरसाळे
सोलापूर: सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ सलग्न पंढरपूर तालुका विज्ञान अध्यापक मंडळ, पंढरपूर यांच्या वतीने आयोजित “आदर्श शाळा व आदर्श विज्ञान शिक्षक” पुरस्कार वितरण सोहळा १७ फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला.
अध्यापन क्षेत्रात गेली अनेक वर्षे उल्लेखनीय व बहुमोल कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव यावेळी करण्यात आला. चालू वर्ष (२०२५–२६) साठी गगनगिरी विद्यालय, सांगवी येथील आदर्श शिक्षक श्री. विष्णू बळवंत दगडे सर यांची “आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कार” साठी निवड करण्यात आली होती. त्यांच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला.शिक्षकी पेशातील सातत्य आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्याच्या दगडे सरांच्या धडपडीचा हा यथोचित सन्मान आहे," अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिरूध्द सालविठ्ठल संचालक श्री.दा.सो.शि.प्र. मंडळ पंढरपूर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. आमदार श्री. दत्तात्रय अच्युतराव सावंत सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय विविध शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर सोहळा विवेक वर्धिनी विद्यालय व ज्युनियर कॉलेज, पंढरपूर येथे पार पडला. कार्यक्रमात पुरस्कार विजेत्यांचा सत्कार, मानपत्र व सन्मानचिन्ह वितरण तसेच उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शनपर भाषण झाले. यावेळी गगनगिरी विद्यालय, सांगवी येथील मुख्याध्यापक अनिल रणदिवे सर तसेच आजिनाथ ढेकळे सर, शिवाजी कदम सर, विष्णू महालिंगडे सर, सुनील पाखरे सर, दादासाहेब सत्रे सर, सुनंदा दळवी मॅडम, सर्जेराव दाईंगडे सर, अनिल सत्रे सर, पी.एस. सत्रे सर, कृष्णात (आण्णा) खोळपे व इतर सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
Tags
सोलापूर

.jpeg)

