या कार्यक्रमास माजी आमदार मा. दत्तात्रय सावंत सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच मा. मोतीराम दादा गोसावी, मा. राजेंद्र आसबे सर तसेच दोन्ही प्रशालांच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नितीन जाधव व श्री मोतीराम काळेल उपस्थित होते.
स्नेहसंमेलनात जि.प. प्रा. शाळा कान्हापुरी, भैरवनाथ विद्यालय कान्हापुरी, जि.प. प्रा. शाळा भूईवस्ती, अंगणवाडी शिंदे वस्ती व अंगणवाडी कान्हापुरी येथील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी बहारदार गीते, नाटिका, बालगीते आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. उपस्थित मान्यवर, पालकवर्ग व शिक्षणप्रेमींनी विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देऊन त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्मिता पाटील मॅडम, सुनीता गिरी मॅडम, दिपाली वास्ते मॅडम, ज्योती पवार मॅडम, योगिता चौरे मॅडम, शेळके मॅडम, राणे मॅडम तसेच हेंबाडे सर, गायकवाड सर, जीवन शिंदे सर, वसावी सर, मगर सर व तानाजी शिंदे सर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


