सोलापूर: गगनगिरी विद्यालय, सांगवी येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ उत्साहात व भावनिक वातावरणात १४ फेब्रुवारी रोजी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी.पी. रोंगे सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य शहाजी (बापू) मुळे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस गगनगिरी शिक्षण प्रसारक मंडळ, सांगवीचे सचिव संभाजी (नाना) सत्रे तसेच शाळेचे मुख्याध्यापक अनिल रणदिवे सर यांनी प्रास्ताविकपर भाषण करून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. अनुमोदन आजिनाथ ढेकळे सर यांनी दिले तर आभार प्रदर्शन विष्णू महालिंगडे सर यांनी केले. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले.
कुंडलिक बोंगाणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना शालेय आठवणींना उजाळा दिला. यावेळी अनेकांचे डोळे पाणावले आणि वातावरण भावनिक झाले. आदर्श शिक्षक श्री. विष्णू बळवंत दगडे सर यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी गगनगिरी विद्यालयाचे सहशिक्षक शिवाजी कदम सर, सुनील पाखरे सर, दादासाहेब सत्रे सर, सुनंदा दळवी मॅडम, सर्जेराव दाईंगडे सर, अनिल सत्रे सर, पी.एस. सत्रे सर व इतर सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न झाला.
Tags
सोलापूर
.jpeg)

