गौतमी पाटीलचा व्हिडीओ व्हायरल करणारा मुलगा पोलिसांच्या ताब्यात

 


पुणे: गौतमी पाटील हिचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला पुणे पोलिसांनी तब्यात घेतले आहे. व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गौतमी पाटील हिने विमानतळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

 गौतमी पाटील हिचा 24 फेब्रुवारी रोजी पुण्यात कार्यक्रम होता. या कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने गौतमी पाटील हिचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ शूट केला होता. त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यानंतर गौतमी पाटील सोबत डान्स करणाऱ्या एका मुलीने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरू होता. 

 दरम्यान, गौतमी पाटील हिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे तिला बदनाम करण्यासाठी तिचा व्हिडीओ शूट करण्यात आला असल्याची चर्चा होती. या प्रकरणावर अनेक तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. महिला कलावंतांसह अनेक राजकारणी मंडळींनीदेखील यावर आवाज उठवला होता.गौतमीचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला अहमदनगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

👉विठूमाऊली न्यूजच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा👈
थोडे नवीन जरा जुने