श्री गगनगिरी विद्यालय सांगवी येथे होळीचा सण उत्साहात साजरा

 

सोलापूर : सांगवी येथील श्री गगनगिरी विद्यालयात होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत भारतीय संस्कृतीचा वारसा जतन करण्याचा संदेश दिला.

या प्रसंगी संस्थेचे संस्थापक सचिव संभाजी नाना सत्रे, शाळेचे मुख्याध्यापक अनिल रणदिवे सर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात होळी पूजनाने झाली. यावेळी मुख्याध्यापक अनिल रणदिवे सर यांनी विद्यार्थ्यांना होळीचा सण का साजरा केला जातो, यामागील पौराणिक आणि सामाजिक पार्श्वभूमी सविस्तरपणे समजावून सांगितली. 'वाईटावर चांगल्याचा विजय' हे या सणाचे मुख्य सूत्र असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून पटवून दिले.

शाळेतील विविध शिक्षकांनी होळीच्या सणाचे पर्यावरणीय आणि सांस्कृतिक महत्त्व सांगणारी मनोगते व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी या सणासाठी लागणारे साहित्य घरून आणले होते. सर्वांनी मिळून शिस्तबद्ध पद्धतीने आणि आनंदात होळी साजरी केली.पारंपारिक पद्धतीने होळी पेटवून तिला नैवेद्य अर्पण करण्यात आला.एकूणच, निसर्गाचे रक्षण आणि सणांचा आनंद या दोन्ही गोष्टींची सांगड घालत गगनगिरी विद्यालयात हा उत्सव संपन्न झाला.

  
थोडे नवीन जरा जुने