जळोली (प्रतिनिधी): माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जळोली येथे वृक्षारोपणाचा पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमासाठी मा. दत्तात्रय (बापू) नरसाळे, संचालक, विठ्ठल सहकारी साखर कारखाना यांनी स्वखर्चातून विविध प्रकारची वृक्षांची रोपे उपलब्ध करून देत वृक्ष लागवड केली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात गावातील नागरिक, युवक व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी उपस्थितांनी "झाडे लावा, झाडे जगवा" हा संदेश देत लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
वृक्षारोपणासाठी उपस्थित ग्रामस्थ गणेश जाधव सर,तानाजी नरसाळे, रवींद्र आबा नरसाळे,शहाजी तात्या नरसाळे, रंगनाथ जाधव,गणपत नरसाळे, बाळासाहेब नरसाळे, सुभाष शिरसट, रावसाहेब गोड, किसन शिरसट, अतुल शिरसट,शंकर भायगुडे, रामचंद्र भायगुडे, पिंटू मदने, किसन नरसाळे, कांतीलाल नरसाळे, रोहन नरसाळे, शिवाजी महाडिक,वैभव माळी,शिवाजी नरसाळे, संभाजी पाटील, शशिकांत फराडे, सुनिल तात्या नरसाळे,महादेव सुतार,जयहिंद नरसाळे, लक्ष्मण फाळके,हरिविजय नरसाळे, तानाजी घोडके, उंबरे गावातून आवर्जून उपस्थित असणारे सुरेश आबा मुळे, पोपट माने, विशेष सहकार्य अमृत गाडेकर इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी आमदार अभिजीत पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
Tags
पंढरपूर


