जळोली (प्रतिनिधी) : माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जळोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना झाडे व खाऊ वाटपाचा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात संपन्न झाला.
यावेळी विद्यार्थ्यांना विविध प्रकारची फळझाडे व सावलीची झाडे भेट देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून आमदार अभिजीत पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या वाट्याला आलेल्या झाडाची नियमित काळजी घ्यावी, त्याचे संगोपन करावे आणि पर्यावरण संरक्षणासाठी योगदान द्यावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत झाडांचे जतन करण्याचा संकल्प केला.
यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले.
याप्रसंगी गणेश जाधव सर, तानाजी नरसाळे, रवींद्र आबा नरसाळे, शहाजी तात्या नरसाळे, रंगनाथ जाधव, गणपत नरसाळे, बाळासाहेब नरसाळे, सुभाष शिरसट, रावसाहेब गोड, किसन शिरसट, अतुल शिरसट, शंकर भायगुडे, रामचंद्र भायगुडे, पिंटू मदने, किसन नरसाळे, कांतीलाल नरसाळे, रोहन नरसाळे, शिवाजी महाडिक, वैभव माळी, संभाजी पाटील, शशिकांत फराडे, सुनिल तात्या नरसाळे, महादेव सुतार, लक्ष्मण फाळके इ. ग्रामस्थांनी उपस्थिती लावली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाची आवड निर्माण होण्यास मदत झाली असून, सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकांकडून सर्वत्र कौतुक करण्यात आले.
Tags
पंढरपूर


