श्री गगनगिरी विद्यालय सांगवी येथील ९३.६१ % निकाल.


 उंबरे प्रतिनिधी : महेश नरसाळे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा परिषद पुणे संचलित मार्च 2024 मध्ये झालेल्या 10 वी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला यामध्ये श्री गगनगिरी विद्यालय सांगवी ता.पंढरपूर जि. सोलापूर येथील निकाल हा 93.61% लागला असून सर्व  परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले* यामध्ये एकूण 47 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील 44 विद्यार्थी पास झालेले असून प्रशालेचा निकाल हा 93.61% लागला आहे. विशेष बाब अशी की यामध्ये 16 विद्यार्थी डिस्टिंक्शन, 21 विध्यार्थी फर्स्ट क्लास तर 5 विद्यार्थी सेकंड क्लास, व 2 विद्यार्थी पास क्लास मध्ये पास झाले आहेत. प्रथम सात  विद्यार्थी हे पुढीलप्रमाणे, 1)  कु. शिंदे भारती अशोक 92.60 %  गुण , 2) कु. महालिंगडे राजश्री विष्णू 89.60% गुण  3 ) कु. शिंदे जगदीश सौदागर 82.40% गुण 3) कु. साठे पायल मल्हारी 82.40% गुण 3) कु. जाधव साक्षी  शिंदे 82.40% गुण 4) कु .बोंगाणे आकांक्षा चंद्रकांत 81.60% गुण 5)कु. भोसले मुक्ता विश्वास 81.60% गुण  6) कु.गलांडे अर्चना धुळदेव 81.40% गुण  7) कु .नरसाळे आरती दशरथ  81% गुण या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे  संस्थेचे  अध्यक्ष मा. श्री. संभाजी तुकाराम सत्रे,  तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.रणदिवे सर व सर्व शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालक यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

थोडे नवीन जरा जुने