पंढरपूर तालुका कृषी अधिकारी एस.बी. मोरे साहेब यांना पीएम किसान योजनेत अपात्र झालेले शेतकरी पात्र करण्याबाबत जनशक्ती शेतकरी संघटनेचे निवेदन.


पंढरपूर: 
पंढरपूर तालुक्यातील अनेक शेतकरी हे पीएम किसान योजनेत पात्र असुन सुद्धा अपात्र झाले आहेत. तरी अशा सर्व शेतकऱ्यांना तात्काळ पात्र करण्यात यावे याबाबत जनशक्ती शेतकरी संघटनेचे पंढरपूर तालुका उपाध्यक्ष महेश नरसाळे यांच्या वतीने तालुका कृषी अधिकारी मोरे साहेब यांना गुरुवारी ३० मे रोजी निवेदन देण्यात आले. 

पीएम किसान योजनेत अपात्र झाल्यामुळे शेतकरी बांधवांना याचा नाहक त्रास होत आहे. आपल्या कृषी ऑफिस पंढरपूर या ठिकाणी शेतकरी बांधवांनी पात्र करण्याविषयी अर्ज देऊन वारंवार हेलपाटे मारुन सुध्दा ते अजून पात्र झालेले नाहीत आणि त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही.

 तरी दिलेल्या अर्जावर कार्यवाही करून तात्काळ अपात्र झालेले शेतकरी पात्र करण्यात यावेत जेणेकरून पीएम किसान योजनेपासून अपात्र झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. आणि शेतकरी बांधवांचा नाहक त्रास बंद होईल. तरी या निवेदनाची तात्काळ दखल घेण्यात यावी.

 अन्यथा जनशक्ती शेतकरी संघटना शेतकरी बांधवांच्या समवेत आपल्या कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल असे त्यांनी निवेदनाद्वारे सांगितले. निवेदन प्रत माहितीसाठी तहसील कार्यालय पंढरपूर यांना देण्यात आली . निवेदन देताना जनशक्ती शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते हनुमंत लांडे व आदी शेतकरी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने