धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयाचा जळोली येथे जल्लोष.


जळोली: माढा लोकसभेची असलेली भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार असलेले रणजीत सिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. माढा लोकसभेच्या निवडणुकीत शरदचंद्र पवार च्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी या चिन्हावर विरुद्ध तर भारतीय जनता पार्टीचे रणजीतसिंह नाईक निंबाळकर कमळ या चिन्हावर यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा 120,837 मताने पराभव केला. व मोठ्या फरकाने विजयी झाले. 

जळोली ता. पंढरपूर गावातील मोहिते -पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी व समर्थकाने गुलालाची उधळण करून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयाचा जल्लोष केला.यावेळी रोहन नरसाळे, थोरात सर, महेश नरसाळे, सोमनाथ कोळेकर सर, रवींद्र आबा नरसाळे, हनुमंत लांडे, कार्तिक सुतार, वैभव माळी, मधुसूधन नरसाळे, बिभीषण शिरसाट, नितीन लांडे, विजय कोळेकर, प्रशांत मगर इत्यादी उपस्थित होते.

विठूमाऊली न्यूज Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा.

👉विठूमाऊली न्यूजच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा👈


थोडे नवीन जरा जुने