कौठाळी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सुरेखा गोडसे यांची निवड.


पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील कौठाळी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सुरेखा रघुनाथ गोडसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीच्या वेळी सरपंच पदासाठी गोडसे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश भडंगे यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. निवडीनंतर माजी आमदार प्रशांतराव परिचारक, प्रणव परिचारक यांनी नूतन सरपंच सुरेखा गोडसे यांचा सत्कार केला.

     यावेळी सोसायटीचे माजी अध्यक्ष ईश्वरा धुमाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आरूण नागटिळक, ह.भ.प.प्रभाकर इंगळे, माजी सरपंच मोहन नागटिळक, महादेव गाढवे, शंकर गोडसे, अनिल नागटिळक, वसंत नागटिळक, उपसरपंच धोंडीराम वाघमोडे, रामदास नागटिळक,अनिल महादेव नागटिळक, बाळासाहेब धुमाळ, मोहन पाटील , विठ्ठल पाटील विकास नागटिळक,शिवाजी नागटिळक, संदीप पाटील, दिलीप इंगळे, नाना गाढवे, रघुनाथ गोडसे,बाळू ईनामदार, रामेश्वर भारती, सचिन आटकळे, विलास पाटील, दशरथ गाढवे, तुकाराम चव्हाण, अरुण धुमाळ, शिवाजी धुमाळ, वैभव धुमाळ,गोरख गोडसे,हरी गोडसे, जहाँगीर इनामदार, यांच्यासह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते.

विठूमाऊली न्यूज Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा.

👉विठूमाऊली न्यूजच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा👈

थोडे नवीन जरा जुने