करकंब पोलीस ठाण्यात ज्येष्ठ नागरिकांची बैठक संपन्न.

 



करकंब/ प्रतिनिधी

        करकंब पोलीस ठाणे हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक करकंब पोलीस स्टेशन येथे नुकतीच उत्साहात पार पडली. या बैठकीत नवीन कायदे, ऑनलाईन फसवणूक तसेच विविध सामाजिक विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करून उपस्थितांशी संवाद साधण्यात आला.

         बैठकीदरम्यान उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या अडी-अडचणी व समस्यांची सविस्तर विचारपूस करण्यात आली. त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी समजून घेत त्यावर योग्य मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कोणत्याही प्रकारची मदत, तक्रार किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ पोलीस ठाणे, संबंधित बीट अंमलदार यांच्याशी संपर्क साधावा, अशा सूचना देण्यात आल्या.

          यावेळी सायबर गुन्ह्यांबाबत विशेष जनजागृती करण्यात आली. ओटीपी, बँक खाते क्रमांक, एटीएम पिन, सीव्हीव्ही, पासवर्ड यांसारखी गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, अनोळखी व्यक्तींना खात्रीशिवाय घरात प्रवेश देऊ नये, अशा महत्त्वपूर्ण सूचना नागरिकांना देण्यात आल्या.

         तसेच ११२ व १९३० या हेल्पलाईन क्रमांकांची माहिती देऊन, गरजेच्या वेळी तत्काळ त्यांचा उपयोग करावा, असे आवाहन करकंब पोलीस स्टेशनचे सपोनि योगेश लंगुटे यांनी केले.

          या बैठकीस करकंब पोलीस स्टेशन अंतर्गत पोहे/ लक्ष्मण भांगे, पोना/ शेखर भोसले विविध गावांतील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करून अशा बैठका नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

  

थोडे नवीन जरा जुने