पत्रकारांचा अपमान करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करा - करकंब विभाग पत्रकार संघ

 


करकंब : शिंदे सेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत खालच्या पातळीत केलेल्या आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ करकंब येथे करकंब विभाग पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करीत करकंब पोलिसांना निवेदन देण्यात आले. करकंब पोलीस स्टेशन येथे करकंब विभाग पत्रकार संघातील सर्व पत्रकार एकत्रित येऊन करकंब पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे यांना निवेदन देत निषेध नोंदविला. 

     यावेळी खासदार संजय पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बोलताना करकंब विभाग पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र करपे यांनी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्याचा आवाज दाबण्याचे काम खासदारांनी केले असून त्याचबरोबर त्यांनी खालच्या पातळीवर येत वक्तव्य केले असल्याचे सांगितले.

    ज्येष्ठ पत्रकार शहाजी काळे यांनी संजय पाटील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत असल्याचे सांगत करकंब पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त केला.यावेळी पत्रकार विश्वनाथ केमकर यांनी संजय पाटील यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

पत्रकारांविरोधात अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या विरोधात शासनाने तातडीने सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी पत्रकार संघांचे अध्यक्ष राजेंद्र करपे,शहाजी काळे, लक्ष्मण शिंदे,विश्वनाथ केमकर,गोपीनाथ देशमुख,नितीन खाडे, ऋषिकेश वाघमारे, ऋषिकेश कवडे, विजय नलवडे, रोहन नरसाळे आदी उपस्थित होते.

  

थोडे नवीन जरा जुने