प्राचार्य दत्तात्रय गाजरे सर यांची मुख्याध्यापक संघाच्या सोलापूर शहराध्यक्षपदी निवड

 

प्रतिनिधी: विष्णू दगडे 

 सोलापूर: सोलापूर शहरातील शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श मार्गदर्शक व नेतृत्वगुणांनी परिपूर्ण व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या प्राचार्य दत्तात्रय गाजरे सर यांची सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 प्राचार्य गाजरे यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या कार्यतत्परतेची दखल घेत त्यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापक महंमद शेख सर, शिंदे सर, आतकरे सर तसेच विविध शाळांतील शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी प्राचार्य गाजरे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली मुख्याध्यापक संघ अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

  
थोडे नवीन जरा जुने