पुणे :बुलेटच्या सायलेंन्सरमध्ये फेरफार करुन फटाक्यांसारखे आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांविरुद्ध हडपसरमधील ससाणेनगर परिसरात कारवाई करण्यात आली. बुलेट चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत काळेपडळ पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार श्रीकृष्ण खोकले यांनी फिर्याद दिली असून दोन बुलेट चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी बुलेटच्या सायलेंन्सरमध्ये फेरफार केले होते. फटाक्यांसारखे आवाज काढून दोघे जण भरघाव वेगाने हडपसमघील काळेपडळ परिसरातून निघाले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडे वाहन परवाना, तसेच दुचाकीची कागदपत्रेही नव्हती. याप्रकरणी आरोपींना नोटीस दिल्याची माहिती हवालदार श्रीकृष्ण खोकले यांनी दिली.
सायलेंन्सरमध्ये फेरफार करुन भरधाव दुचाकी चालविण्याचे प्रकार वाढले आहेत. फटाक्यांसारखे आवाजामुळे नागरिकांना विशेषत: ज्येष्ठांना त्रास होतो. यापूर्वी पोलिसांनी कारवाई करुन फटाक्यांसारखे आवाज काढणारे सायलेन्सर जप्त केले होते. जप्त केलेले सायलेन्सर नष्ट करण्यात आले होते.


