कान्हापुरीच्या राहुलचा न्यूझीलंडमध्ये डंका घोड्यांच्या रेसिंग स्पर्धेत तब्बल २५ लाखांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस.


उंबरे प्रतिनिधी: महेश नरसाळे 

सोलापूर: कान्हापुरी (ता. पंढरपूर) येथील राहुल भारती या तरुणाने न्यूझीलंडमध्ये झालेल्या घोडे रेसिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी करत तब्बल २५ लाखांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. राहुलच्या या यशामुळे संपूर्ण परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. राहुलला बालपणापासूनच घोडेस्वारीची प्रचंड आवड होती. गावातील पारंपरिक घोडेस्वारी पाहून वाढलेली ही आवड पुढे त्याने कौशल्यात रूपांतरित केली. सातत्यपूर्ण सराव आणि उच्च दर्जाचे प्रशिक्षण यांच्या जोरावर त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.

करोळे येथील विवाहीत महिलेचा चारित्रयाचे संशयावरून खून करून आत्महत्या केल्याचा बनाव...


अवघ्या ३२ वर्षांच्या राहुलने आंतरराष्ट्रीय पातळीवर इतकी भव्य कामगिरी करत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. स्पर्धेत विविध देशांतील नामांकित रायडर्स सहभागी झाले होते. या कठीण स्पर्धेत राहुलने आपले कौशल्य सिद्ध करत विजेतेपद पटकावले. राहुलने लालन-पालनापासून घोड्यांची काळजी, रेसिंगचे तंत्र, स्पीड कंट्रोल, स्टॅमिना ट्रेनिंग यांचे बारकावे पुण्यातील विशेष प्रशिक्षण केंद्रात शिकले. दीड वर्षाच्या प्रशिक्षणानंतर त्याला न्यूझीलंडमध्ये रेसिंगची संधी मिळाली आणि त्याने पहिल्याच मोठ्या स्पर्धेत चमक दाखवली.

सरपंच, कान्हापुरी सौ. कोमल दयानंद शिंदे यांनी सांगितले— “घोडे रेसिंग स्पर्धेत राहुल यांनी देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. राहुलच्या यशाने कान्हापुरी गावात जल्लोषाचे वातावरण आहे. गावाचा हा अभिमानाचा क्षण आहे.”


 राहुलची प्रतिक्रिया...

 राहुलने सांगितले की, “मी ज्या लोकांनी मला मार्गदर्शन केले आणि साथ दिली त्या सर्वांचा हा विजय आहे. पुढेही देशासाठी आणखी मोठ्या स्पर्धेत यश मिळवण्याचा प्रयत्न करेन."

     

थोडे नवीन जरा जुने