आसाम:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधील कालियाबोर येथील रू 6950 कोटी रुपयांच्या काझीरंगा उन्नत मार्गिका प्रकल्पाचे(राष्ट्रीय महामार्ग 715 च्या कालियाबोर- नूमालीगढ टप्प्याचे चौपदरीकरण) भूमी पूजन केले. यावेळी त्याना आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांचे त्यांनी आभार मानले.
काझीरंगाला आपण दुसऱ्यांदा भेट दिली असून 2 वर्षांपूर्वी दिलेल्या भेटीतील अनेक प्रसंग त्यांच्या स्मरणात कायम कोरले गेले आहेत असे त्यांनी म्हटले. काझीरंगा मध्ये रात्री मुक्काम करण्याची संधी मिळाली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हत्तीवरून केलेल्या सफरीत त्यांना जवळून निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेता आला होता याचा त्यांनी उल्लेख केला.
आसामला भेट देऊन आपल्याला नेहमीच खूप आनंद होतो असे त्यांनी सांगितले. आसाम ही साहसी युवकांची भूमी असून आसामचे तरुण तरुणी सर्वच क्षेत्रात त्यांचे कलाकौशल्य दाखवण्यास तत्पर असतात असे त्यांनी सांगितले.
गुवाहाटी इथे कालच झालेल्या बुगुरुंबा द्वौ उत्सव प्रसंगी आपण उपस्थित होतो आणि तिथे बोडो समुदायाच्या लेकींनी त्यांच्या नृत्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला हे त्यांनी आवर्जून नमूद केले. 10 हजारांहून अधिक कलाकारांनी उत्साहाने सादर केलेल्या या बगुरुंबा नृत्यात खाम व सिफांग च्या तालावर नाचणाऱ्या कलाकारांनी सर्व उपस्थितांचे मन जिंकून घेतले होते असे ते म्हणाले.
.png)

