सोलापूर: उंबरे पागे (ता. पंढरपूर) येथील रहिवासी कै. हरिदास वैजिनाथ कानगुडे (वय ४४) यांचे दिनांक २२ जानेवारी रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
कै. कानगुडे हे मनमिळाऊ, शांत स्वभावाचे व सर्वांना मदत करण्यासाठी तत्पर असे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. अल्पवयातच त्यांचे निधन झाल्याने अपूरणीय अशी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मागे दोन मुलं, आई-वडील, तसेच एक भाऊ असा त्यांचा परिवार आहे. कुटुंबियांसह सर्व नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
Tags
पंढरपूर


