चक्क काकाने पुतण्याची कुऱ्हाडीने वार करत हत्या केल्याची घटना.

 

बुलढाणा: बुलढाण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरगुती वादातून चक्क काकाने पुतण्याची कुऱ्हाडीने वार करत हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. सदर घटना बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील हातनी गावामध्ये घडली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद रामचंद्र जाधव असे आरोपीचे नाव असून त्याच्या पुतण्याचे नाव गोपाल अजबराव जाधव असे होते. काल सायंकाळी विनोद आणि गोपालमध्ये किरकोळ कारणावरून कडाक्याचं भांडण झालं.त्यानंतर दोघेही झोपण्यासाठी गेले. मात्र विनोदच्या पोटात राग खदखदत होता. त्याच संतापात त्याने झोपलेल्या गोपालच्या डोक्यात आणि छातीवर कुऱ्हाडीने वार केले. या मारहाणीत गोपाल गंभीर जखमी झाला.

करोळे येथील विवाहीत महिलेचा चारित्रयाचे संशयावरून खून करून आत्महत्या केल्याचा बनाव... 

कुऱ्हाडीचे वार खोल असल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. त्यामुळे गोपाल जाधवचा जागीच मृत्यू झाला.यातनेने विव्हळत असलेल्या पुतण्याची काकाला जरासुद्धा दया आली नाही. या घटनेनंतर आरोपी विनोद जाधव हा राहत्या घरातून फरार झाला होता. परंतू पोलिसांनी तपास  वेगाने फिरवत आरोपीला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

  

थोडे नवीन जरा जुने