उस्मानाबाद: पोलीस ठाणे नळदुर्ग चे वतीने सन २०२३ मध्ये पोलीस ठाणे नळदुर्ग हद्दीतील शासकीय सेवेत नियुक्ती झालेल्या ३५ उमेदवार व त्यांच्या पालकांना पोलीस ठाणे येथे बोलावून तसेच पोलीस ठाणे नळदुर्ग हदीतील उत्कृष्ट काम करणारे ०८ पोलीस पाटील यांचा मा. पोलीस अधीक्षक उस्मानाबाद श्री. अतुल कुलकर्णी, मा.डॉ. सई भोरे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते मा. प्रविण स्वामी रोटरी क्लब उमरगा यांच्या हस्ते दि. २७/०५/२०२३ रोजी १८.०० वा. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
तसेच उत्कृष्ट काम करणारे पोलीस पाटील यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्र व ट्रॅपी देवून सत्कार करण्यात आला. तसेच शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या उमेदवार प्रविण रामचंद्र हांडगे, ज्योती सुधाकर लोहार, अतुल बबन कांबळे, प्रिया रासाहेब बंडगर, जिवण उत्तम घंटे, सारिका दत्ता माळी, नवनाथ शिवाजी दबडे, जिजा विठोबा कांबळे, ऐश्वर्या शशिकांत गवळी, सरस्वती राजेंद्र चव्हाण, चाँद शेखर पिंजारी, प्रशांत बब्रुवान शिरगिरे, आण्णा नेताजी शिरगिर, श्रीशैल्य सिद्राम बिराजदार, विक्रम आप्पाराव सावंत, संदीप केशु राठोड, अजय संजय सोनकांबळे, तेकाराम गणपत पाटील, पुनम हरीलाल लोंढे, प्रिया रावसाहेब बंडगर, सोमनाथ शंकर हिंगमिरे, पुजा अर्जुन जगदाळे, सुजित विठ्ठल भोसले, आस्मा जावेद पठाण, विक्रम व्यंकट सावंत, नानासाहेब देविदास सावंत, आबासाहेब तुकाराम शिरोगरे, लक्ष्मी मारुती शिवकर, चैतन्य गणेश लांडगे, राधा प्रकाश बिराजदार, भैया देविदास जांभरे, मोहसिन कुरेशी, सचिन बेले, अक्षय जाधव, देविदास राठौड़ तसेच पोलीस ठाणे नळदुर्ग हद्दीतील उत्कृष्ठ काम करणारे पोलीस पाटील गजेंद्र मच्छिन कोणाळे, भागवत शंकर भालशंकर, देविदास हरीदास चव्हाण, बेबी रतन रेड्डी, बसवेश्वर काशिनाथ सांगवे, अमोल दत्तात्रय हिप्परगे, विनोद गुंडेराव सलगरे, नरेश अरविंद जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
सदर सत्कार कार्यक्रमास मा. पोलीस अधीक्षक उस्मानाबाद श्री. अतुल कुलकर्णी, मा. डॉ. सई मोरे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते मा. प्रविण स्वामी रोटरी क्लब उमरगा, पोलीस ठाणे नळदुर्ग प्रभारी श्री. सिध्देश्वर गोरे, श्री. पिराजी तायवाडे, व पोलीस ठाणे नळदुर्ग येथील पोलीस अंमलदार उपस्थितीत होते.
👉विठूमाऊली न्यूजच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा👈
