पुणे: पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा येथे महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी यांचे OPSU-1 सत्र क्र. 15 हे दिनांक 08/05/2023 ते 20/05/2023 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणार्थी यांना सीसीटीएनएस प्रणाली तसेच केंद्र व राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले आयसीजेएस सर्च पोर्टल व इतर महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन/व्याख्यान देणे करिता पोलीस हवालदार इकबाल शेख सोलापूर ग्रामीण यांना आमंत्रित करण्यात आले होते.
सर्व प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी यांना सीसीटीएनएस प्रणाली, पोलीस रेकॉर्ड वरून गुन्हे व गुन्हेगारांचा शोध घेणे व गुन्हे प्रकटीकरणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून अद्यावत माहिती उपलब्ध करून घेण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल प्राचार्य मा. श्री. मकानदार सर, उप-प्राचार्य मा. श्री. पाटील सर , समन्वयक अधिकारी पो.नि. श्री. चंद्रकांत जाधव सर पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा यांनी पोलीस हवालदार इकबाल शेख सोलापूर ग्रामीण यांचे पुष्परोप देऊन सत्कार करण्यात आला.
Tags
महाराष्ट्र
.jpg)