राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सापटण्याच्या बहीण - भावाची चमकदार कामगिरी

प्रतिनिधी : महेश नरसाळे

सोलापूर: भोपाल येथे झालेल्या ६९ व्या राष्ट्रीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याचा मान उंचावत गौरी ढवळे हिने सुवर्ण, तर तिचा भाऊ साईप्रसाद ढवळे याने रौप्य पदक पटकावत उत्तम कामगिरी केली.गौरीने १९ वर्षाखालील मुलींच्या गटात, तर साईप्रसादने १४ वर्षाखालील मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले.

दोघेही अकोले (खु.) येथील बबनरावजी शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयीन शाळेत शिकत असून, ही दोघांची सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि नेमबाजीतील कौशल्य यशाला कारणीभूत ठरले.गौरीचे हे सलग तिसरे राष्ट्रीय सुवर्ण, तर साईप्रसादचे पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेतील रौप्य पदक हे खास ठरले. दोघांना हरिभाऊ होले व राजेंद्र अनवते यांचे प्रशिक्षण लाभले.

संस्थेचे अध्यक्ष आमदार संजयमामा शिंदे, रणजितभैय्या शिंदे, मुख्याध्यापक राजेंद्र ठोंबरे, क्रीडाशिक्षक श्री. माने व श्री. श्रीराम यांनी विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.

    

थोडे नवीन जरा जुने