पंढरपूर: क्रीडा व युवा सेवा संचनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद संगमनेर जिल्हा अहिल्यानगर आयोजित विभागीय स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सन 2025- 26 मध्ये श्री गगनगिरी विद्यालय सांगवी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर प्रशालेला टेनिकॉईट स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलींच्या संघास उपविजेतेपद मिळाले.
तसेच 14 वर्ष व 17 वर्ष मुलीच्या संघास तृतीय क्रमांक मिळाला व उत्कृष्ट खेळाडूंची निवड जिल्हा वाशिम येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धा साठी अंजली अरविंद सत्रे, श्रावणी डांगे, श्रेया दादासाहेब सत्रे यांची निवड झाली आहे व मुलांचा14 वर्षाखालील संघ विभागीय स्तरीय स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त करत यश प्राप्त केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संकेत दत्तात्रय कदम याची निवड झाली आहे व पुढील स्पर्धेसाठी संस्थेचे सचिव संभाजी नाना सत्रे प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल रणदिवे सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व त्यांना मार्गदर्शन करणारे श्री विष्णू दगडे सर व क्रीडा शिक्षक दादासाहेब सत्रे सर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


