भारतीय स्त्रीशक्तीचे जगाला विराट दर्शन - उपमुख्यमंत्री अजित पवार


मुंबई, दि. २५ : ढाका येथे झालेल्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चायनीज तैपेइचा ३५-२८ असा पराभव करून भारतीय महिला कबड्डी संघाने विश्वविजेतेपद पटकावले. भारतीय महिला खेळाडूंनी चिकाटी, जिद्द आणि संघभावनेच्या जोरावर जगासमोर भारतीय स्त्रीशक्तीचे विराट सामर्थ्य अधोरेखित केले आहे.

 हा विजय केवळ क्रीडाक्षेत्रातील पराक्रम नसून देशातील लाखो मुलींना प्रेरणा देणारा ऐतिहासिक क्षण आहे. भारतीय महिलांची विक्रमी कामगिरी नव्या भारताच्या सामर्थ्याची जाणीव करून देणारी असून, त्यांच्या खिलाडूवृत्तीसह कठोर परिश्रमाला मी मनापासून सलाम करतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी संघाचे अभिनंदन केले. 

YouTube

विठूमाऊली न्यूज Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा.

👉विठूमाऊली न्यूजच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा👈


                               



 









थोडे नवीन जरा जुने