शौचालयाचे व्यवस्थापन बघणाऱ्या खाजगी संस्थेकडून महिलांचे वाजवी पेक्षा जास्त पैसे घेतले जातात. अशा तक्रारी उपस्थित महिलांनी परिवहनमंत्र्यांच्याकडे केल्या. तसेच जवळच असलेल्या पाणपोई परिसरात देखील अत्यंत अस्वच्छता असल्याचे त्यांना आढळून आले. या बाबतीत उपस्थित आगार व्यवस्थापक व वाहतूक नियंत्रक यांना समाधान कारक उत्तरे देता आली नाहीत.
त्यामुळे संबंधित आगार व्यवस्थापक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांना वरिष्ठांनी कारणे दाखवा नोटीस बजावावी असे निर्देश मंत्री महोदयांनी यावेळी दिले. तसेच पुढील ४ दिवसात उपरोक्त त्रुटी दूर करून प्रवाशांना चांगल्या सुविधा निर्माण करून देण्याचे निर्देश देखील संबंधितांना त्यांनी दिले आहेत.
याबाबत पुढील दौऱ्याच्या वेळी पुनश्च: तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर देखील प्रवासी सुविधा मध्ये हलगर्जीपणा आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या वर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा सज्जड दम यावेळी मंत्री सरनाईक यांनी दिला.
![]() |
| YouTube |
विठूमाऊली न्यूज Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा.
👉विठूमाऊली न्यूजच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा👈

