सोलापूर, दि. 26 :- गरीब व वंचित कुटुंबांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा विनामूल्य उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने राबविलेल्या आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) या एकत्रित आरोग्य योजनेची सोलापूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा आता २२ फेब्रुवारीला...
शासनाच्या या आरोग्य योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठी अंगीकृत रुग्णालयांनी पारदर्शकता व जबाबदारीने काम करून तक्रारींचे वेळेत निवारण करावे व जनतेचा या आरोग्य योजनावरील विश्वास अधिक दृढ करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
भारतीय स्त्रीशक्तीचे जगाला विराट दर्शन - उपमुख्यमंत्री अजित पवार...
आज सोलापूर जिल्हा तक्रार निवारण समिती व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, आयुष्मान भारत योजनेचे समन्वयक डॉ. दीपक वाघमारे, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे समन्वयक डॉ. प्रवीण गुंजाळ यांच्यासह सर्व समिती सदस्य उपस्थित होते.


