सोलापूर: दि. ६ जानेवारी रोजी उंबरे पागे ता. पंढरपूर येथे पत्रकार दिनानिमित्त आमदार अभिजित (आबा) पाटील यांच्या DVP बँक शाखा उंबरे पागे यांच्या वतीने विठू माऊली चे पत्रकार महेश नरसाळे यांचा शाल, श्रीफळ आणि फेटा बांधून बँकेचे संचालक शरद मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले मेजर विकास मोरे साहेब यांचा ही सत्कार करण्यात आला. तसेच नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पत्रकार महेश नरसाळे व मेजर विकास मोरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
![]() |
| YouTube |
यावेळी उपस्थित आबा प्रेमी मान्यवर अमर इंगळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष, माजी सरपंच रंगनाथ हुबाले, सचिन चव्हाण, शिवाजी वावरे, सचिन कृपाळ, हरिदास कदम, राजेश पवार, नरसाळे साहेब, रुपेश जाधव साहेब तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक, ठेवीदार व खातेदार उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक DVP बँकेचे नवनाथ इंगळे साहेब यांनी केले त्यामध्ये त्यांनी बँकेची व ठेवीबद्दल सविस्तर माहिती दिली. तर सर्वांचे आभार बालाजी गुंड साहेब यांनी मानले.

