प्रतिनिधी: महेश नरसाळे :
सोलापूर: दि. ५ जानेवारी २०२५ रोजी वार रविवार सिध्देश्वर मंगल कार्यालय शेटफळ चौक शेटफळ ता. मोहोळ जि. सोलापूर येथे ऑनलाइन प्रोजेक्टर च्या साह्याने विशाल सत्संग सेवेचे आयोजित करण्यात आले होते. संत रामपाल जी महाराज यांचा विशाल सत्संग हा अध्यात्मिक मार्गदर्शनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या सत्संगांमध्ये संत रामपाल जी महाराज मानवजातीला शाश्वत शांती, मोक्ष, आणि खऱ्या धर्मज्ञानाचा मार्ग दाखवतात. त्यांच्या प्रवचनांद्वारे श्रोते वेद, गीता, कुराण, बायबल आणि गुरु ग्रंथ साहेब यातील सखोल ज्ञान आत्मसात करतात.
![]() |
| YouTube |
सत्संग आयोजनात संत रामपाल जी महाराज समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड, व्यसन आणि भेदभाव नष्ट करण्यासाठी जनजागृती करतात. त्यांच्या प्रवचनांमध्ये भक्ति मार्गाचा खरा अर्थ, ईश्वरप्राप्तीचा सुलभ मार्ग आणि साधनेचा महत्त्वाचा विषय स्पष्टपणे मांडला जातो. या कार्यक्रमांमध्ये प्रवचन, आणि आत्मा शुद्धीकरणाचे तत्त्वज्ञान शिकवले जाते. ऑनलाइन सत्संगाच्या माध्यमातून संत रामपाल जी महाराज हजारो लोकांना व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित करतात. त्यांच्या शिक्षणामुळे सामाजिक सुधारणा होत आहे आणि अनेक लोक आध्यात्मिक आनंद व समाधान अनुभवत आहेत. सत्संग ही मानवतेच्या उत्थानाची दिशा दाखवणारी प्रकाशमान ज्योत आहे.
सत्संगात सहभागी होण्यासाठी कोणताही शुल्क नसतो , आणि सर्वांसाठी प्रवेश खुला असतो. येथे सत्संग समाप्त झाल्यानंतर (चाय बिस्केटे सेवा ) दिली जाती. सत्संगाचा ठिकाणी पाणी व पार्किंग सुविधा उपलब्ध असते. आज शेटफळ येथे संपन्न झालेल्या विशाल सत्संगासाठी संपुर्ण सोलापूर जिल्ह्यातून १२२ भगत - जगत जणांनी हजेरी लावली. सत्संग समाप्त झाल्यानंतर मोफत नामदिक्षा व त्या सोबत संत रामपाल जी महाराज यांचा फोटो, जप माळ मोफत दिले जाते, कोणताही शुल्क घेतला जात नाही. या सत्संग ठिकाणी रामपाल जी महाराज यांचे फोटो, जप माळ, रक्षा कवच, ज्ञान गंगा पुस्तक, जगण्याचा मार्ग पुस्तक इत्यादींचे धर्मार्थ मुल्य घेऊन वाटप करण्यात आले.

