काळेंची शेती फायद्यात अन् कारखाना मात्र तोट्यात -अभिजीत पाटील

 


पंढरपूर:  सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याचे २३ कोटी रुपये थकीत बिल आहे. यामधून भंडीशेगाव मधील एका तरुणाचे बत्तीस हजार रुपये देण्यासाठी कारखान्याकडे बिल नाही. ही बाब खेदाची आहे.ग्रामीण भागातील सर्वसाधारण मजुरीला जाणाऱ्या महिलेकडे जाऊन पाहिलं तरी एवढी रक्कम असू शकते. 

रांझणी येथे सहकारी शिरोमणी श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीचा प्रचाराचा शुभारंभ...

चेअरमन काळे यांनी कारखान्यातील कारभारापेक्षा आपल्या शेतीकडे लक्ष दिल्याने शेती फायद्यात आणली आहे अन् कारखाना मात्र तोट्यात असल्याचे भासवत आहेत. असा टोला चेअरमन अभिजीत पाटील यांनी काळे यांना लगावला आहे.

माझे वडील असते तर अभिमानानं सांगितलं असतं की अभिजीत सर्वसामान्य शेतकरी सभासदांसाठी लढतोय - अभिजीत पाटील...

पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे बुधवारी सायंकाळी सहकार शिरोमणी विठ्ठल परिवर्तन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित बैठकीत अभिजीत पाटील बोलत होते. यावेळी डॉ बी. पी. रोंगेसर, दीपक पवार अमरजीत पाटील, बाळासाहेब कोलगे यांच्यासह विठ्ठलचे संचालक उपस्थित होते.

विठूमाऊली न्यूज Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा.

👉विठूमाऊली न्यूजच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा👈


थोडे नवीन जरा जुने