पंढरपूर: सहकार शिरोमणीची निवडणूक चांगलीच चुरशीची होत चालली आहे. दोन्ही बाजूकडून आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच सत्ताधारी काळे गटावर कारखान्याकडून देणी न दिल्याचा मोठा ठपका येत आहे. अशातच काळे यांना सावरण्यासाठी विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनीही पुढाकार घेतला आहे. पण ज्यांना स्वतःच जमल नाही.स्वतः थकबाकीदार असताना त्यानी आता दुसऱ्याला जामीन होण्याची भूमिका घेतली आहे. ती या सभासदांना चालणार नाही. अशी खात्री विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली आहे.
आपण या जिल्ह्यात साखर कारखानदारीत आल्यापासून अनेक कारखानदारांचे नुकसान होत आहे. आपण या कारखाना मधील सर्वच माहिती सभासद, कामगार यांना सांगत आहे. यामुळे काळेबेरे करण्यासाठी अडचणी वाढत आहेत. याचाच परिणाम म्हणून आपल्याला रोखण्याचा प्रयत्न विविध मार्गाने केला जात आहे. परंतु यामध्ये हित असलेला महत्वाचा घटक सभासद आणि कामगार यांना आपली भूमिका पटली आहे. त्यामुळे विठ्ठल बरोबर सहकार शिरोमणी एकत्रित कारभार करत असताना उत्पादन खर्च कमी होऊन अधिकचा नफा त्यांनाच मिळणार आहे. यामुळे सत्तांतर अटळ असल्याची खात्री आपल्याला पक्की असल्याचे मत अभिजीत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
Tags
पंढरपूर
