महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा पंढरपूरच्या शहराध्यक्षपदी शंकरराव कदम तर तालुकाध्यक्षपदी रोहन नरसाळे यांची निवड!

पंढरपूर (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा पंढरपूरच्या शहराध्यक्षपदी शंकरराव  कदम तर तालुकाध्यक्षपदी रोहन नरसाळे यांची निवड झाली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र कोरके पाटील यांनी दिली.

        याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंढरपूर येथे प्रसिद्धी माध्यमांमध्ये वृत्तपत्र, दुरचित्रवाहिनी, दैनिक, साप्ताहिक, स्तंभलेखन, वृत्तपत्रलेखन आदि क्षेत्रात कार्यरत असलेल्या ३० पत्रकारांची, संपादकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

 त्यामध्ये विविध विषयांवर साधकबाधक चर्चा करण्यात आली, तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा पंढरपूरच्या २०२६ सालाकरीता पदाधिकाऱ्यांच्या निवडी बिनविरोध जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार प्रमोद भोसले यांच्या सुचनेनुसार व श्री राजेन्द्र कोरके पाटील यांच्या अनुमोदनाने पंढरपूर शहराध्यक्षपदी शंकरराव  कदम यांची निवड करण्यात आली आहे. 

तर मावळते अध्यक्ष रामदास नागटिळक यांच्या सुचनेनुसार व रविंद्र कोळी यांच्या अनुमोदनाने पंढरपूर तालुकाध्यक्षपदी रोहन नरसाळे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीवेळी ३० पत्रकार हजर होते. निवडीनंतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नंतर सर्व उपस्थित पत्रकारांना अल्पोपहार देण्यात आला. शेवटी सर्व पदाधिकाऱ्यांनी विश्वमालक पांडुरंगजींचे दर्शन घेतले.


     

थोडे नवीन जरा जुने