अरण येथील सबस्टेशनचा आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

सोलापूर: माढा मतदार अनेक वर्षांपासून संघातील प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी याच बरोबर शेतकऱ्यांना रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी सातत्याने आमदार अभिजीत पाटील हे प्रयत्न करताना दिसत आहेत. अनेक वर्षांपासून अरण येथील शेतकऱ्यांना पुरेसा वीजपुरवठा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.  

पंढरपूर- लोणंद रेल्वे प्रकल्पाच्या कामाचा विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्याकडून आढावा...

गांभीर्याने लक्ष घालून आमदार अभिजीत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून अरण येथील ५ के.व्ही.सबस्टेशनची क्षमता दुप्पट केली असून या सब स्टेशनचे उद्घाटन आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी आमदार पाटील यांनी नव्याने उभारण्यात आलेल्या सब स्टेशनची क्षमता दुप्पट झाल्याने अरण गावासह तुळशी, जाधववाडी, बैरागवाडी या गावांतील नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा होणार असल्याने समाधान व्यक्त केले.

संतोष देशमुखांच्या हत्येचे व्हिडीओचे स्क्रीनशॉर्ट घेऊन फोटोंचा चार्जशीटमध्ये समावेश...

पुढील काळात अर्थसंकल्पीय अधिवेशनात ग्रामीण भागातील विजेच्या समस्यांबाबत चर्चा व्यथा मांडल्या आहेत. लवकरच त्याचा देखील पाठपुरावा करून कामे मार्गी लावण्याचा विश्वास आमदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी मा.जि.प.सदस्य भारत शिंदे,चंद्रकांत आबा गिड्डे, एकनाथ सुर्वे, हरिदास रणदिवे, शरद मोरे, नारायण माळी, प्रमोद कुटे, बालाजी पाटील, यशवंत शिंदे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

YouTube

विठूमाऊली न्यूज Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा.

👉विठूमाऊली न्यूजच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा👈

थोडे नवीन जरा जुने