माघ यात्रा :वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर प्रशासन सज्ज -गहिनीनाथ महाराज औसेकर.

                  पंढरपूर दि .05:-  माघ एकादशी मुख्य सोहळा दि. 08 फेब्रुवारी रोजी असून, यात्रा कालावधी दि.02 ते 12 फेब्रुवारी असा आहे. या यात्रेला सुमारे 4 ते 5 लाख भविक पंढरपूरात येतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा  मंदिर समितीच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.


   माघी यात्रा कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनरांगेत बॅरीकेटींग करून त्यावर ताडपत्री शेड, जादा पत्राशेडची निर्मिती, आपत्कालीन मार्ग, विश्रांती कक्ष, दर्शन रांगेत बसण्याची सुविधा, लाईव्ह दर्शन, कुलर-फॅन, मिनरल वॉटर, चहा – खिचडी आदी सुविधा उपलब्ध राहणार आहेत. यात्रेनिमित्त भाविकांची होणारी गर्दी विचारात घेता, त्यांना सुलभ व जलद दर्शनासाठी प्राधान्य देण्यात येणार असून, त्यासाठी पुजांची संख्या कमी करून स.6.00 ते रा.12.00 पर्यंत दर्शन उपलब्ध राहणार आहे. दर्शनरांग जलद व द्रुतगतीने चालविण्यासाठी अनुभवी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

थोडे नवीन जरा जुने