करकंब: चंदीगड या ठिकाणी झालेल्या बाराव्या राष्ट्रीय गदा युद्ध स्पर्धेत करकंब येथील आदर्श प्रशाला व जुनिअर कॉलेज चे विद्यार्थी लखन राजेंद्र मदने- गोल्ड (प्रथम),महेश संजय जाधव-गोल्ड (प्रथम),हर्षद ज्ञानेश्वर चौधरी-गोल्ड (प्रथम),संकेत नागनाथ पवार-सिल्व्हर(द्वितीय),प्रबुद्ध दादासाहेब कडलक-ब्राँझ( तृतीय),बालाजी सुभाष तरंगे-सिल्व्हर(द्वितीय) यश संपादन केले असून श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय गदायुद्धासाठी त्यांची निवड झाली आहे.
या सर्व खेळाडूंना श्री देवानंद थोरात सर (कोच),प्रशालेच्या शिक्षक श्री.खांडेकर सर यांचे मार्गदर्शन लाभले या सर्वांचे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री बाळासाहेब देशमुख, संस्थेचे अध्यक्ष श्री रामदास काका शेटे ,संस्थेचे सचिव पांडुरंग काका व्यवहारे ,प्रशालेच्या प्राचार्य श्रीमती उंडे मॅडम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Tags
सोलापूर

