कुंथलगिरी ता. भूम जिल्हा. धाराशिव येथील श्री देशभूषण कुलभूषण विद्यालयाचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून चि. शिवाजीराजे चंद्रहास काळे हा विद्यार्थी ९७.४० टक्के गुण घेऊन प्रशालेतून प्रथम आला आहे.
तसेच चि.अभिजीत कुंडलिक कुटे ९२.२० टक्के गुण घेऊन द्वितीय तर चि. प्रवीण रामराजे सुरवसे ९२.०० टक्के गुण घेऊन तृतीय आला आहे
मुलींमध्ये कु. ज्योती पांडुरंग हाके ८५.६० गुण घेऊन प्रशालेमध्ये प्रथम आली आहे. निकलेची वैशिष्ट्ये म्हणजे ९० टक्केच्या वर ९ विद्यार्थ्यांना गुण मिळाले आहेत.
विशेष प्राविण्य प्राप्त २५ विद्यार्थी तर प्रथम वर्गात १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे मानद सचिव डॉ .रणजीत गांधी, विश्वस्त भूषणभाई शहा, परागभाई शहा, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रेमचंद देवसाळे व सर्व पालकांनी मनपूर्वक अभिनंदन केले.
विठूमाऊली न्यूज Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा.
👉विठूमाऊली न्यूजच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा👈
