जळोली: जळोली ता. पंढरपूर येथील गावातील शासकीय अधिकारी व कर्मचारी कर्तव्याच्या ठिकाण राहत नसून ग्रामपंचायतचा खोटा ठराव जोडून गावात राहत असल्याचे भासवत आहेत.
तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषीवर कारवाई करण्यात यावी. तसे न झाल्यास या विरोधात जनशक्ती शेतकरी संघटनेचा गट विकास अधिकारी यांच्या निवासस्थानी अर्धनग्न आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सदरचे निवेदन गट विकास अधिकारी पंढरपूर, तहसीलदार पंढरपूर, शहर पोलीस स्टेशन पंढरपूर दिले असल्याची माहिती जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
सदरच्या निवेदनावर कुठलीही कारवाई न झाल्यास 10 जून रोजी गट विकास अधिकारी पंढरपूर यांच्या निवासस्थानी अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार असल्याचे जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने माहिती देण्यात आली.
