रांझणी येथे सहकारी शिरोमणी श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीचा प्रचाराचा शुभारंभ


 
पंढरपूर: सहकार शिरोमणीचे निवडणुकीतील परिवर्तन पॅनलचे चिन्ह घड्याळ आले असून उमेदवाराच्या प्रचारासाठी रांझणी येथे प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. सरकोली येथे सभासदासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, डॉ. बी.पी.रोंगेसर, दिपक पवार यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे संचालक मंडळ व सर्व उमेदवार उपस्थित होते.

माझे वडील असते तर अभिमानानं सांगितलं असतं की अभिजीत सर्वसामान्य शेतकरी सभासदांसाठी लढतोय - अभिजीत पाटील...

पुढे बोलताना चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले की,स्व.वसंतराव काळे यांच्या निधनानंतर  सहकार शिरोमणीवर कल्याणराव काळे हे चेअरमन होते. आणि विठ्ठलवर स्व . भारतनाना भालके असे दोन्ही चेअरमन आपल्याच विठ्ठल  परिवारातील होते. परंतु भारतनाना भालके यांना  कल्याणराव काळे यांनी 2004 साली सांगितली होते; की विठ्ठल कारखान्याचा जो चेअरमन असतो तोच तालुक्याचा आमदार असतो. परंतु कल्याणराव काळे यांनी त्यावेळी ऐकले नाही. परिचारक पार्टीतील राजूबापू पाटील यांना इकडे आपल्या विठ्ठल परिवारात आणून आमदारकीची उमेदवारी दिली. त्यावेळीच खऱ्या अर्थाने आपला परिवार काळेंनी फोडण्याचे काम केले आहे.

पंढरीच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे... 

आज मी सुद्धा भारतनाना भालके यांचा कार्यकर्ता आहे.त्यामुळे विठ्ठलच्या निवडणुकीमध्ये नानांचे आशीर्वाद मिळाले.त्याचप्रमाणे सरकोली गावातून सभासद व जनता सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आशीर्वाद देईल व या नानांच्या आशीर्वाद मुळे आम्ही नक्कीच सहकार शिरोमणी साखर कारखान्याची निवडणूक जिंकू. असा आशावाद चेअरमन अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

विठूमाऊली न्यूज Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा.

👉विठूमाऊली न्यूजच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा👈

थोडे नवीन जरा जुने