परिवर्तनाच्या लढ्याला अभिजीत आबांचा धक्का गुणकारी ठरणार - माजी संचालक दिपक पवार

पंढरपूर:सहकार शिरोमणीची प्रगती होण्याऐवजी वरचेवर अधोगती होत असल्याचे चित्र निर्माण करून स्वतःचेच घर भरणाऱ्या चेअरमन काळे यांना बाजूला सारून या कारखान्यावर परिवर्तन घडवून आणण्यासाठी मी आणि रोंगेसर यांनी वेगवेगळे लढत सुरुवात केली होती. त्यावेळी मागील निवडणुकीत अपयश आले होते.

आता...कल्याणरावासाठी  भगीरथ भालकेचा जामीन - अभिजीत पाटील ...

 मात्र त्यांना त्यातूनही सुधारण्यासाठी अनेक वर्ष संधी मिळूनही कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे आम्ही आता या निवडणुकीत दोघेही एकत्रित तर आलोच आहोत. परंतु दिलेला शब्द पाळणारा आणि कारखाना चालवणारा माणूस म्हणून ब्रँड ठरलेले श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीत मात्र नक्की यश मिळणार असून अभिजीत पाटील यांचाच धक्का परिवर्तनासाठी गुणकारी ठरणार असल्याचा विश्वास याच कारखान्याचे माजी संचालक आणि सध्याचे उमेदवार ॲड दिपक पवार यांनी व्यक्त केला आहे.

काळेंची शेती फायद्यात अन् कारखाना मात्र तोट्यात -अभिजीत पाटील...

अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन आघाडी पॅनलचे उमेदवार यांच्या प्रचारसाठी शनिवारी तावशी येथे जाहीर सभा आयोजित केली होती. यावेळी दिपक पवार बोलत होते. यावेळी विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील, मार्गदर्शक डॉ बी पी रोंगे सर, अमरजित पाटील, यांच्यासह विठ्ठल चे संचालक उपस्थित होते.

रांझणी येथे सहकारी शिरोमणी श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीचा प्रचाराचा शुभारंभ...

माझे वडील असते तर अभिमानानं सांगितलं असतं की अभिजीत सर्वसामान्य शेतकरी सभासदांसाठी लढतोय - अभिजीत पाटील...

विठूमाऊली न्यूज Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा.

👉विठूमाऊली न्यूजच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा👈

थोडे नवीन जरा जुने