पीसीपीएनडीटी जिल्हा सल्लागार समितीची बैठक संपन्न

  


सोलापूर: गर्भधारणा व प्रसूतिपूर्व निदान व तंत्रज्ञान जिल्हा सल्लागार समितीची बैठक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. 

उद्योग विभागाच्या योजनाचा लाभ घेऊन तरुणांनी उद्योजक व्हावे - केंद्रीय मंत्री नारायण राणे...

या बैठकीस श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे बालरोग विभाग प्रमुख डॉ. सचिन बंदीछोडे, डॉ. विजय शेटे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मिलिंद शहा, जिल्हा सरकारी अभियोक्ता अँड. क्यातम, स्त्री रोग प्रमुख व प्रसुती शास्त्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. विवेक विरकर आदि उपस्थित होते.

गौतमी  पाटीलचा  व्हिडीओ  व्हायरल  करणारा  मुलगा  पोलिसांच्या  ताब्यात...

या सभेमध्ये जिल्ह्यामध्ये स्रीभृणहत्या रोखण्यासाठी व मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी, गर्भलिंग निदान होवू नये, यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. गर्भधारणा व प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सर्व समिती सदस्यांनी सूचना दिल्या. एकूण ७ नवीन सोनोग्राफी सेंटर्सना मान्यता देण्यात आली. तसेच नुतनीकरणासाठी २ सेंटरना मान्यता देण्यात आली.

विठ्ठल  सह.साखर  कारखाना  येथे  भूमिपूजन  व  शेतकरी  मेळावा...


👉विठूमाऊली न्यूजच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा👈

थोडे नवीन जरा जुने