![]() |
पंढरपूर (प्रतिनिधी) - देशाचे नेते आदरणीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते श्री विठ्ठल सह.साखर कारखाना येथे बायो - सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन व शेतकरी मेळावा रविवार, दि.७ मे २०२३ रोजी सकाळी ९ वा. कारखाना स्थळावर संपन्न होणार आहे.
गौतमी पाटीलचा व्हिडीओ व्हायरल करणारा मुलगा पोलिसांच्या ताब्यात...
आदरणीय श्री.पवार साहेबांची आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली असता साहेबांनी कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे.
आषाढी वारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नियोजन करावे -जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर...
सदर कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यातील सर्व मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी शेतकरी सभासद,ऊस उत्पादक शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक यांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन अभिजित पाटील यांनी केले आहे.
👉विठूमाऊली न्यूजच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा👈
