आपले सरकार सेवा केंद्रांच्या संख्येत वाढ – माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

 



मुंबई : राज्यात झपाट्याने डिजिटलायझेशन व्हावे आणि राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ रीतीने उपलब्ध करून देण्यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ यांचे जाळे विस्तारीत करण्यात येणार असून सेवा केंद्राची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली.माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सुधारित निर्णयानुसार, लोकसंख्या आणि प्रशासनाच्या गरजेनुसार सेवा केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे सांगत याबाबतचे सुधारित निकष मंत्री ॲड.शेलार यांनी जाहीर केले.

संतोष देशमुखांच्या हत्येचे व्हिडीओचे स्क्रीनशॉर्ट घेऊन फोटोंचा चार्जशीटमध्ये समावेश...

सुधारित निकषानुसार ग्रामपंचायत स्तरावर ५००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी १ ऐवजी २ सेवा केंद्रे तर ५००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी २ ऐवजी ४ सेवा केंद्रे देण्यात देणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात २५००० लोकसंख्येसाठी १ ऐवजी २ केंद्रे तर इतर महानगरपालिका व नगरपरिषद क्षेत्रांमध्ये १०००० लोकसंख्येसाठी १ ऐवजी २ सेवा केंद्रे देण्यात येणार असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी जाहीर केले.

ब्लॅकमेल करत प्रियकराने केले मित्रासह लैंगिक अत्याचार.... 

ग्रामीण भागातील सेवा केंद्राबाबत प्रत्येक नगर पंचायतीसाठी १ ऐवजी २ सेवा केंद्रे तर ५००० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगर पंचायतींसाठी २ ऐवजी ४ सेवा केंद्रे असा विस्तार केला जाणार आहे.सध्या आपले सरकार सेवा केंद्रांवरील सेवा शुल्क रु. २०/- इतके असून, २००८ पासून या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती. वाढती महागाई आणि सेवा केंद्र चालकांच्या मागणीच्या अनुषंगाने सेवा शुल्क रु. ५०/- करण्यात येणार आहे.

YouTube

विठूमाऊली न्यूज Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा.

👉विठूमाऊली न्यूजच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा👈



थोडे नवीन जरा जुने