प्रतिनिधी: नितीन खाडे
पंढरपूर: करकंब येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लिटिल बर्ड इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम शनिवार रोजी दुपारी ३ वाजता आनंदमय व उत्साहाने संपन्न झाला.
या कार्यक्रमास माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील उपस्थित होते. याप्रसंगी आमदार अभिजीत पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून लिटिल बर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त केला व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अँड. दिलावर कडगे संस्थापक सचिव जमीर कडगे, अँड. शरदचंद्र पांढरे, ग्रामसेवक सतीश चव्हाण, सतीश देशमुख रघुनाथ जाधव मुस्ताक बागवान धनंजय गुळवे, बबीता ताई देशमुख, कल्पनाताई देशमुख, सारिका ताई पूरवत इत्यादी सह अनेक प्रमुख मान्यवर आणि पालक उपस्थित होते.
Tags
सोलापूर

